Site icon e लोकहित | Marathi News

आंतरधर्मीय लग्नाबाबत राखी सावंतच्या कुटुंबाने दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आयुष्यभर तिने खूप दु:ख सोसले त्यामुळे…”

Rakhi Sawant's family reacts to interfaith marriage; Said, "She suffered a lot throughout her life because of..."

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाते. राखी ही टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. राखी सावंत सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. इतकंच नाही तर राखी सावंत लोकांचे मनोरंजन करण्यात आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात नेहमीच अग्रेसर असते. दरम्यान राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे. सध्या याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, राखीच्या लग्नाबद्दल तिच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे.

धक्कादायक! पुण्यातील सिंहगड रोडवर गॅसची पाईपलाईन फुटून अग्नितांडव

एका मुलाखतीती राखीचा भाऊ राकेश याने सांगितले की, “ तिच्या लग्नाबद्दल मला जास्त काही माहिती नाही. मात्र तिने लग्न केले असेल तर तिने खूप विचार करून हा निर्णय घेतला असेल. राखी सर्वात लहान असून तिने आयुष्यभर खूप दु:ख सोसले आहे. त्यामुळे आता तिने लग्न केलंय, तर ती खूश राहावी.” अशी प्रतिक्रिया राखीच्या भावाने दिली आहे.

जगातील पहिले रोबोट कॅफे! कॉफी पासून स्नॅक्स पर्यंत रोबोटच बनवून हातात देणार…

दरम्यान, राखी सावंतने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सर्वाना याबाबत माहिती दिली आहे. मात्र आदिलने लग्नाबदद्ल अजून कोणताच खुलासा केलेला नाही. आपण इतक्यात लग्नाबद्दल काहीच बोलणार नसल्याचं तो म्हणाला आहे.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! सिन्नर- शिर्डी महामार्गावर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

Spread the love
Exit mobile version