
मुंबई – शहरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून, हवामान विभागाने पुढील ३ तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईच्या सायन, लोअर परळ, वरळी, दादर, कुर्ला, घाटकोपर, पवई या भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा मारा सुरु आहे. यासोबतच ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांनी शक्यतो घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
Pune News । पुण्यातील बोपदेव घाटात धक्कादायक प्रकार; पोलिसांनीच केलं गैरकृत्य
हवामान विभागाच्या रडारवर मुंबईच्या आकाशात घनदाट ढग व वाऱ्यांची सक्रियता स्पष्ट दिसत असून, काही ठिकाणी विजांचा कडकडाटही होत आहे. चर्चगेट, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा, फोर्ट या सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी.
Banana Crop Damage । वादळी पावसाचा तडाखा! केळीबागांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपत्कालीन परिस्थितीत १९१६ या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सर्व महापालिका यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले असून, जलनिकासीची कामे वेगात सुरू असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबईसह नवी मुंबई, रायगड आणि डोंबिवली परिसरांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नवी मुंबईतील वाशी, बेलापूर, नेरुळ परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल भागांतही पावसाचा जोर दिसून येतो आहे.
Havaman Andaj । राज्यात माॅन्सूनचा मुक्काम; मुसळधार पावसाचा इशारा, रेड आणि ऑरेंज अलर्ट
डोंबिवली पश्चिमेकडील एच-वर्ड रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, पावसाळ्यापूर्वीची तयारी अपुरी असल्याची तक्रार स्थानिक यंत्रणांकडे केली जात आहे.