Rahil Shaikh । मनसे नेत्याचा मुलगा मद्यधुंद, रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत… सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Rahil Shaikh

Rahil Shaikh । अंधेरीतील रस्त्यावर रविवारी रात्री घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजते आहे. मनसेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याने मद्यधुंद अवस्थेत अर्धनग्न राहून रस्त्यावर गोंधळ घातल्याचा आरोप सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेने केला आहे.

राजश्री मोरेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याचा व्हिडीओ शेअर करत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. व्हिडीओमध्ये राहिल शेख हा जोरजोरात शिवीगाळ करताना, “मी जावेद शेखचा मुलगा आहे, पैसे घे आणि जा!” अशा शब्दांत धमकी देताना स्पष्ट दिसतो. यावेळी तो अर्धनग्न असून, दारूच्या नशेत असल्याचेही स्पष्ट आहे.

राजश्री मोरेच्या आरोपानुसार, राहिलने नशेत गाडी चालवत तिच्या कारला धडक दिली. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. तिने लगेच पोलिसांत तक्रार दाखल केली असून एफआयआरची प्रतसुद्धा सोशल मीडियावर शेअर केली आहे. विशेष म्हणजे, तिने हेही सांगितले की, एफआयआरनंतर तिला मनसे कार्यकर्त्यांकडून धमक्या येत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rajshree More (@rajshree_more_official)

या प्रकरणामुळे राजकीय दबावाचा संशय निर्माण झाला आहे. राहिल शेखने केवळ राजश्रीवरच नाही, तर घटनास्थळी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवरही अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे.

गेल्या काही महिन्यांत राजश्री मोरे ही दुसऱ्यांदा मनसेशी वादात अडकली आहे. याआधी तिने मनसेच्या “मराठी भाषा अभियानावर” विधान करत स्थलांतरितांचे समर्थन केले होते. त्यावरूनही वाद निर्माण झाला होता. सध्या सुरू असलेल्या या नव्या प्रकरणावर सोशल मीडियावर नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, पोलिस आणि राजकीय यंत्रणेकडून निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे.

Spread the love