
मुंबई : दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर यंदा शुक्रवारी(१९ऑगस्ट) दहीहंडी(Dahihandi)उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडला. मुंबई ठाण्यासह राज्यात सगळीकडेच हा दहीहंडीचा कार्यक्रम दणक्यात साजरी करण्यात आला. दरम्यान याच दहीहंडी कार्यक्रमात थर रचताना अनेक ठिकाणी काही गोविंदा जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या.पण बुलडाण्यातून(Buldhana) एक वेगळीच धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे दहीहंडी कार्यक्रमात जमावाने एका गोविंदाला बेदम मारहाण केली आहे.त्या गोविंदाला ही मारहाण तब्बल तीन मिनिट करण्यात आली. ही मारहाण नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.खर तर ही हाणामारी चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale) आणि भाजपा (BJP) युवा मोर्चाने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात झाली.
नेमकी घटना काय घडली?
बुलढाण्यात चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले आणि भाजपा युवा मोर्चाने दहीहंडी कार्यक्रम आयोजित केला होता. हा दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी होत होता.दहीहंडी फोडण्यासाठी याठिकाणी अनेक गोविंदा जमले होते.यावेळी डॉल्बीच्या धुंदीत सगळे नाचताना दिसत होते.पण अचानक जमावाने एका गोविंदाला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.या हाणामारीत एक गोविंदा जखमी झाला आहे.
मात्र, बुलडाण्यातून आता धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले आणि भाजपा युवा मोर्चाने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी झाली.कार्यक्रमामध्ये झालेल्या या हाणामारीत एक गोविंदा जखमी झाला आहे. दहीहंडी फोडण्यासाठी याठिकाणी अनेक गोविंदा जमले होते.पोलीस तेथे पोहचले पण एवढ्या गर्दीमध्ये जाऊन तरुणाला वाचवायला वेळ लागला आणि तब्बल तीन मिनिट या गोविंदाला मारहाण झाली. या घटनेमुळे तिथं एकच खळबळ उडाली