Pune News । पुण्यातील बोपदेव घाटात धक्कादायक प्रकार; पोलिसांनीच केलं गैरकृत्य

Pune News

Pune News । पुणे – शहराच्या शिस्तबद्ध पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारी एक धक्कादायक घटना समोर आली असून, कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विक्रम वडतीले याने बोपदेव घाटात एका तरुणाकडून २८ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणामुळे पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून, संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करताच त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

Banana Crop Damage । वादळी पावसाचा तडाखा! केळीबागांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

ही घटना बोपदेव घाटात घडली असून, तक्रारदार तरुण हा चेन्नईचा रहिवासी आहे. तो आपल्या मित्रासह फिरण्यासाठी पुण्यात आला असताना, त्यांच्या बॅगेत हुक्का पॉट आढळल्याचे कारण देत पोलीस कर्मचारी वडतीले याने कारवाईची भीती दाखवून ३० हजार रुपयांची मागणी केली. अखेर २८ हजार रुपये Google Pay द्वारे त्याने स्वीकारल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. पैसे दिल्यानंतर तरुणाला झालेल्या अन्यायाची जाणीव झाली आणि त्याने थेट कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत विक्रम वडतीलेविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

Havaman Andaj । राज्यात माॅन्सूनचा मुक्काम; मुसळधार पावसाचा इशारा, रेड आणि ऑरेंज अलर्ट

या घटनेमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायद्यास रक्षण करणाऱ्या पोलिसांकडूनच खंडणी उकळली जात असल्याच्या घटना नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि भीती निर्माण करत आहेत. अशा घटनांमुळे पोलिसांवरील जनतेचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पोलिस आयुक्तालयाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला असून, पोलीस दलाची विश्वासार्हता आणि शिस्त टिकवण्यासाठी अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Spread the love