
Pune Landslide । राजगड : सध्या पावसाने राज्यात थैमान घातले असून दरड कोसळण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. इर्शाळवाडी या ठिकाणी तर दरड कोसळून संपूर्ण गावाचं नष्ट झाले आहे. दरम्यान सध्या देखील दरड कोसळल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किल्ले राजगड (ता. वेल्हे) या ठिकाणी बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे दगड निसटले असून या ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. (Rajgad Treaking Point)
मुलं आई-वडिलांचा निरोप घेऊन शाळेत गेली, पण घरी आल्यावर पाहिलं असं काही की…
शनिवारी म्हणजेच आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने या मार्गावर पर्यटक नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र किल्ल्याच्या धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन पुरातत्व विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांनी फिरण्यासाठी येताना विचार करून यावे असे देखील सांगण्यात येत आहे. (Pune Landslide)
दरड कोसळल्याची माहिती स्थानिक नागरिक पर्यटकांनी दिली आहे. दरम्यान या घटनेबद्दल माहिती मिळताच पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पर्यटकांना धोकादायक ठिकाणावरून जाण्यासाठी रोखले. राज सदरे कडून बालेकिल्लाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी दरड कोसळली आहे. यामुळे इथे पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे.
Vidharbha Rain Update । मुसळधार पावसाने विदर्भात 48 तासात घेतला 8 जणांचा बळी, तर 30 नागरिक जखमी