
Pune Accident News । समृद्धी महामार्गबरोबरच पुण्यामध्ये देखील दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण हे वाढत चालले आहे. या अपघातामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे तर काहींना अपंगत्व देखील येत आहे. रस्ते कितीही चांगले असले तरी अपघात हे घडतच आहेत. सध्या देखील पुण्यातून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Viral Video । लहान मुलांना गाडीच्या छतावर झोपवून लहान SUV कार धावली; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
पुण्यातील कात्रज बोगद्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात खूप विचित्र असल्याचे बोलले जात आहे. तेथील उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच गाड्या एकमेकांना आदळल्या आणि हा भीषण अपघात झाला आहे. सध्या बोगद्यातील या गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्यास सुरुवात केली. या अपघातामध्ये एक महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बोगद्यात असताना अचानक एका वाहनाने ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकल्या गेल्या आणि हा भीषण अपघात झाला आहे.
Supriya Sule । गौतम अदानी आणि शरद पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांनी दिली मोठी प्रतिक्रिया!