
Pm Kisan Yojna : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अनेक शेतकरी फायदा घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक सहारा मिळतो. आत्तापर्यंत या योजनेचे १३ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. मात्र आता मागच्या काही दिवसापासून शेतकरी १४व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पीएम किसानचा १४ वा हप्ता जारी करणार आहेत.
Urfi Javed । उर्फी जावेदचा नवीन लूक पाहून चाहते वैतागले, म्हणाले; ‘तू इतकी वाईट..’
या योजनेचा १४वा हप्ता २८ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाईल. याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण की, सध्या काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे तर काहींची अजूनही पेरणी बाकी आहे. त्यामुळे आर्थिक सहाय्य मिळावे असे शेतकऱ्यांना वाटत होते. अशातच आता या हप्त्याची तारीख देखील निश्चित झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Pm Kisan Yojna)
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. केंद्र सरकार हे पैसे 2000-2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये देते. प्रत्येक हप्ता 4 महिन्यांत जारी केला जातो. यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर इ केवायसी केली नसेल तर लगेच करा अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकता.