Site icon e लोकहित | Marathi News

सामनाच्या पहिल्या पानावर पंतप्रधानांसह शिंदे-फडणवीस सरकारचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

Photo of Shinde-Fadnavis government with Prime Minister on front page of match; Discussion in political circles

एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) बंडखोरी करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यामुळे शिवसेनेमध्ये चांगलीच दरी निर्माण झाली आहे. यांनतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. यांनतर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करायची एकही संधी सोडत नसल्याचे आपल्याला दिसत आहे. विशेष म्हणजे,शिवसेनेच्या सामनामधून सत्ताधाऱ्यांवर वारंवार टीका केली जात असते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने सामनामध्ये पानभर जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आपले आहे.

ब्रेकिंग! पुण्यामधील जुन्या बाजारात भीषण आग

शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या पहिल्याच पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पानभर जाहिरात करण्यात आली आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे फोटो देखील आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

कोणतीही जिम न लावता रिक्षाचालक झाला बॉडी बिल्डर! बॉडी बघून तुम्हीही व्हाल थक्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येणार आहेत. याबद्दलची जाहिरा सामनामध्ये मुख्य पानावर पानभरून करण्यात आलेली आहे.महत्वाची बाब म्हणजे ठाकरे गटाकडून मोदींच्या दौऱ्यावर टीका केली जात होती. कारण ठाकरे गटानं जी कामं केली त्या कामांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. यानंतर आज सामनामध्ये (Samna ) आलेली मोदींची जाहिरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

बारामती-मुंबई रेल्वे सुरू होणार? सुप्रिया सुळे यांचे आश्वासन

Spread the love
Exit mobile version