Site icon e लोकहित | Marathi News

Parth Pawar । पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा, चुकीला माफी नाही; बड्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Parth Pawar

Parth Pawar । मुंढवा आणि कोंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आले आहेत. पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीवर संशयित जमीन खरेदीसंदर्भात गंभीर आरोप होत आहेत. या कंपनीतील मुख्य भागीदार म्हणून पार्थ पवार यांचं नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

या प्रकरणात राज्य सरकारने विशेष चौकशी पथक (SIT) नेमलं असून, आठ अधिकाऱ्यांची समिती या सर्व व्यवहाराचा तपास करत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका महिन्यात या चौकशीचा अहवाल सादर होणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, या तपासानंतरही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

आता शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट अजित पवारांच्या मुलावर म्हणजेच पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “चुकीला माफी नाही. चोरी करून दुसऱ्या दिवशी पैसे भरले म्हणजे गुन्हा मिटत नाही. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. दादांच्या मुलालासुद्धा कायद्याच्या चौकटीत आणावं,” असं ठणकावून धंगेकर म्हणाले.

धंगेकरांनी पुढे अजित पवारांवर वैयक्तिक टोला लगावत म्हणाले, “दादांचं कोणी ऐकत नाही, पक्षातले ऐकत नाहीत आणि आता मुलंही ऐकत नाहीत. मोठ्या पदाचा वापर करून गैरव्यवहार होत असतील, तर ती चौकशी ईडीमार्फत व्हायलाच हवी.”

Spread the love
Exit mobile version