Site icon e लोकहित | Marathi News

Urvashi Rauteel: “पंत भाई के लिए पनौती हो तुम…”, काल भारत- पाक सामन्यानंतर उर्वशी रौतेलावर संतापले युजर्स

"Pant bhai ke liye panauti ho tum...", users were furious with Urvashi Rautela after the India-Pak match yesterday.

pc - facebook

मुंबई : दुबईत काल (4 सप्टेंबर) आशिया कप टी-20 च्या लढतीत भारत-पाक (IND vs Pak)सामना झाला. खरतर कालचा भारत-पाक सामना नेहमीप्रमाणे चुरसीचा झाला. मात्र या सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. कालच्या सामन्यात चाहत्यांना विश्वास होता की रिषभ पंत (Rishabh Pant) विराट कोहलीसोबत मिळून मोठी खेळी खेळेल. परंतु चाहत्यांचा विश्वास तुटला असून रिषभ केवळ 14 धावा करून आऊट झाला.

दरम्यान यानंतर सोशल मीडिया युजर्सनी रिषभवर संताप व्यक्त करत त्याला ट्रोल केलं आहे. परंतु चाहत्यांनी फक्त एकट्या
रिषभला नाहीतर त्याची गर्लफ्रेंड असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi routela)ही देखील ट्रोल झाली. उर्वशी रौतेला ही रिषभ पंतसाठी ‘पनौती’ आहे, असं म्हणत चाहत्यांनी तिला स्टेडियमवर बॅन करण्याची मागणी केली.

Sanjay Raut: ‘या’ अधिकाऱ्यांच्या जबाबामुळेच संजय राऊत अडचणीत, नेमक काय आहे प्रकरण

हिच्याचमुळे मॅच हरलो…

दरम्यान उर्वशीचा स्टेडियममधला व्हिडीओ समोर आला आहे.यावर एका युजरने ,” ही इंडियाला चीअर करायला गेली होती की रिषभ पंतला?” असा सवाल केला आहे.तसेच दुसऱ्या युजर्सने कमेंट केळी आहे की , हिला क्रिकेट आवडत नाही तर ही का येते मॅच पाहायला, खोटारडी कुठली, तर अजून एका युजरने फक्त हिच्याचमुळे आपण मॅच हरलो, अशी कमेंटही एका युजरने केली.

Eknath Shinde: मराठीतील ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी शेअर केली भावुक पोस्ट

पंत भाई के लिए पनौती हो तुम, ये पनौती फिर आ गई मॅच देखने, ये जब भी मॅच देखने जाती है, इंडिया की हार होती है, इसको बुलाता कौन बे, अशा कमेंट अनेक युजर्सनी केल्या.

मागील बऱ्याच दिवसांपूर्वी उर्वशी व रिषभ यांच्यात शाब्दिक युद्ध. रंगलेले पाहायला मिळालं. यावेळी उर्वशीने एका मुलाखतीत अप्रत्यक्षपणे रिषभवर भाष्य करताना तो मला भेटण्यासाठी 12-14 तास थांबला होता व त्याने मला 60 मिस्ड कॉल दिल्याचे तिने म्हटलं होतं. त्यावर रिषभनेही सडेतोड उत्तर दिलं होतं.‘लोकप्रियता मिळवण्यासाठी काही जण खोटं बोलतात’, असंच तो थेट या पोस्टमध्ये म्हणाला होता.

Gulkand: गुलकंद खाल्ल्याने शरीरास होतात हे फायदे; वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version