
मुंबई : बस बाई बस’ हा कार्यक्रम झी मराठीवर चालू आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेल्या महिला सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली. आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली.
यावेळी पंकजा मुंडेंनी त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी सुबोध भावेंनी पंकजा मुंडेंना एका खेळादरम्यान दुसऱ्या पक्षामधील आमदार फोडलेत का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत पंकजा मुंडे ‘हो’ म्हणाल्या. त्यावर सुबोध भावेंनी कोण कोण आणि कधी कधीअसे विचारले. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या सर्व सांगितलं तर अजून एक तास लागेल. त्यावर सुबोध भावे देखील म्हणाला आम्हाला चालेल असे म्हटलं.
दरम्यान पंकजा मुडेंनी “महाविद्यालयीन दिवस जगताचं आले नाही असा देखील खुलासा केला. त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांबाबत प्रश्न देखील विचारण्यात आला. त्यावेळी त्या म्हणाल्या, “माझ्या महाविद्यालयीन दिवसांमध्ये मुंडे साहेब गृहमंत्री होते. त्यांच्याबरोबर सुरक्षारक्षक असायचे. त्याचबरोबरीने माझ्याबरोबरही तेव्हा सुरक्षारक्षक होते. त्यामुळे मला महाविद्यालयीन दिवसांची मजा घेताच आली नाही. सुरक्षारक्षक बघूनच लोक घाबरायचे. पण एकदा कोणाशी मैत्री झाली की ती शेवटपर्यंत असायची.”