Site icon e लोकहित | Marathi News

कारखान्यावर छापा पडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Pankaja Munde reacts after factory raid; said…

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Cooperative Sugar Factory) GST विभागाचा छापा पडल्याची माहिती समोर आली आहे. GST च्या अधिकाऱ्यांनी कारखान्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरु आहे. सकाळी १० वाजेपासून हे याधिकारी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात पोहोचले.

या कारवाईनंतर माध्यमांशी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मागच्या अनेक दिवसापासून कारखान्यात आर्थिक अडचणी आहेत. कारखाना देखील बऱ्याच दिवसापासून बंद आहे. कमी उत्पादन, उसाचा अभाव आणि अधिकचं कर्ज या कारणांमुळे कारखाना अडचणीत असल्याचं पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.

दरम्यान, केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्या प्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या काही दिवसापासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आणि यामध्येच आता कारखान्यावर कारवाई केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Spread the love
Exit mobile version