
PAK vs PM-11 । पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा आता एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तानसाठी ‘पाकी’ हा शब्द वापरल्याने येथे गदारोळ सुरू आहे. पाकिस्तानचे क्रिकेट चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ याला लज्जास्पद कृत्य म्हणत आहेत. वाद वाढल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही याप्रकरणी माफी मागितली आहे.
पाकिस्तान संघ कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान-11 विरुद्ध सराव सामना खेळत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी, जेव्हा सामन्याचा पहिला डाव सुरू होता आणि पाकिस्तानचे फलंदाज खेळपट्टीवर उभे होते. मग फॉक्स क्रिकेट ब्रॉडकास्टने चूक केली. इथे टीव्ही फुटेजवर PAK ऐवजी PAKI असे लिहिले होते. ‘पाकी’ हा शब्द अपमानास्पद जातीवाचक मानला जातो कारण तो पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या किंवा मूळ पाकिस्तानी असलेल्या व्यक्तीला सूचित करतो.
Rohit Pawar । अजित पवार गटाबाबत रोहित पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
जेव्हा हा शब्द स्कोअरबोर्डवर दिसला तेव्हा डॅनी सईद नावाच्या पत्रकाराने चूक पकडली आणि फोटोसह सोशल मीडियावर पोस्ट केली. काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर पाकिस्तानच्या अनेक क्रिकेट चाहत्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला चुकीचे म्हणत टीका केली. जेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ही चूक समजली तेव्हा त्यांनी एक निवेदन जारी करून याप्रकरणी माफी मागितली.
काय म्हणाले क्रिकेट ऑस्ट्रेलिया?
पत्रकार सईदने सोशल मीडियावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे वक्तव्यही पोस्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या चुकीवर म्हटले आहे की, ‘हे ग्राफिक एका स्वयंचलित फीडमधून आले आहे, जे पाकिस्तान संघाच्या सामन्यांसाठी यापूर्वी कधीही वापरले गेले नव्हते. हे स्पष्टपणे निराशाजनक होते. चूक लक्षात येताच आम्ही ती स्वतःच दुरुस्त केली.
A clarifier on this from CA: “The graphic was an automatic feed from a data provider which had not been used previously for a Pakistan game. This was obviously regrettable, and the error we corrected manually as soon as it came to light.” https://t.co/7FttR2iZTR
— Daany Saeed (@daanysaeed) December 6, 2023