Site icon e लोकहित | Marathi News

एक वक्तव्य आणि नितीश कुमार परत अडकले; म्हणाले, “आम्ही पुरुष रोज लैंगिक संबंध ठेवतो परंतु,..”

One statement and Nitish Kumar only stuck; Said, "We men have sex every day but,.."

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात बोलताना खळबळजनक विधान केले आहे. यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. महिला सुशिक्षित झाली तर लोकसंख्या रोखू शकते. पुरुष कुटुंब नियोजनावर फार लक्ष देत नाहीत. असे म्हणत नितीश कुमार यांनी लोकसंख्या वाढीवर (increasing Population) विधान केले आहे. हे विधान लिंगभेदी असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून होत आहे.

प्रवीण तरडे यांची मोठी घोषणा! मुळशी पॅटर्नचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

वैशाली येथे आयोजित केलेल्या समाधान यात्रेत बोलताना नितीश कुमार ( Nitish Kumar) यांनी हे विधान केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ” आम्ही पुरुष दररोज लैंगिक संबंध ( Sex Relations) ठेवतच असतो. परंतु, बाळ जन्माला घालायचं नाहीये यावर आमच लक्ष नसतं. मात्र, जेव्हा महिला सुशिक्षित बनते त्यावेळी स्वतःला गरोदर राहण्यापासून सुरक्षित कसं ठेवायच हे तिला समजते.”

धक्कादायक! शैक्षणिक सहलीला गेलेले विद्यार्थी रायगडच्या समुद्रात बुडाले

यामुळे लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी महिलांनी सुशिक्षित होणे आवश्यक आहे. असे मत नितीश कुमार यांनी मांडले आहे. त्यांच्या या विधानावर भाजप व इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. दरम्यान भाजपचे सरचिटणीस नितीश आनंद यांनी ट्विट करत नितीश कुमार यांच वक्तव्य लिंगभेदी असल्याचे म्हंटले आहे. याशिवाय भाजपा नेते अमित मालवीय यांनी देखील नितीश कुमार यांनी ही गोष्ट चांगल्या प्रकारे सांगायला हवी होती. अशी टीका केली आहे.

इंदुरीकर महाराजांच्या सासूचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला मोठा धक्का!

Spread the love
Exit mobile version