
IND vs WI । भारतीय संघ (Indian team) सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर आहे. भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध (IND vs WI) दोन कसोटी, तीन वन डे तसेच पाच टी-20 सामने खेळायचे असून या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने (Test series) होणार आहे. यातील पहिला सामना हा 12 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (Latest Marathi News)
या दौऱ्यासाठी सिलेक्टर्सकडून काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून त्यांनी दोन विकेटकीपरची निवड केलीय. एक म्हणजे केएस भरत (KS Bharat) आणि दुसरा म्हणजे इशान किशन (Ishan Kishan). परंतु मॅनेजमेंटला या दोघांपैकी एका खेळाडूची निवड करावी लागणार आहे. भरतची विकेटकीपिंग चांगली असली तरी त्याची बॅटिंग फारशी चांगली नाही. उलट इशान किशन हा पंत सारखाच आक्रमक असून त्याची बॅटिंग चांगली आहे.
अजित पवारांचे बंड फसणार! राज्यात पुन्हा तिसरा भूकंप येणार, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
कसोटी सामन्यांनंतर एकदिवसीय सिरीज भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. मागील महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आताच्या होणाऱ्या सामन्यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
“फडणवीस मोंदींची थुंकी झेलून म्हणाले”…. ‘सामना’ तून भाजपवर बोचरी टीका