
ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातातील 275 बळींपैकी जवळपास 100 जणांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे कुटुंबीयांच्या दु:खात भर पडली आहे. आपल्या बेपत्ता प्रियजनांच्या शोधात नातेवाईक रुग्णालयाच्या शवागारापासून स्थानकापर्यंत चकरा मारत आहेत. अनेक कुजलेले मृतदेह आहेत.
भीषण अपघात! कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू, तर २ जण गंभीर जखमी
कोणाचे डोके गायब आहे, कोणाचा हात किंवा पाय कापला आहे. शरीराचे काही अवयव असे आहेत की अनेक जण दावा करत आहेत. मृतदेह कोणाच्या ताब्यात द्यायचा हे राज्य सरकार ठरवू शकले नाही? अशा परिस्थितीत आता डीएनए चाचणी ही या लोकांची शेवटची आशा आहे.
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा14 वा हप्ता
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने मंगळवारी भुवनेश्वरमधील किमान तीन कुटुंबांची भेट घेतली. या तिन्ही कुटुंबीयांनी दावा केला आहे की, त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह दुसऱ्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्याचवेळी काही नातेवाईक दररोज शवागारात येत आहेत. डीएनए चाचणीचा निकाल आल्यानंतरच मृतदेह ताब्यात देण्यात येतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.