Site icon e लोकहित | Marathi News

उर्फी जावेदला मुंबईमध्ये कोणीही भाड्याने घर देत नाही

No one is renting a house to Urfi Javed in Mumbai

अतरंगी कपड्यामुळे आणि वक्तव्यामुळे उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. मागच्या काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांच्यामुळे देखील उर्फी चांगलीच चर्चेत आली. आता देखील उर्फी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

धक्कादायक! मुलाने मुलगी पळून नेल्याने संपूर्ण कुटुंबानेच केली आत्महत्या

सध्या उर्फीच्या एका ट्विटची जोरदार चर्चा चालू आहे. मुंबईमध्ये उर्फीला राहण्यासाठी भाड्याने घर पाहिजे. मात्र तिला कुणीही घर देत नाहीये. यासंदर्भात उर्फीने ट्वीट करत मुंबईमध्ये भाड्याने घर मिळत नसल्याची माहिती दिली आहे.

धक्कादायक! दौंड तालुक्यातील भीमा नदीमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

ट्विट करत उर्फीने लिहिले की, “माझ्या कपड्यांमुळे मुस्लिम मालक मला घर भाड्याने देऊ इच्छित नाहीत, मी मुस्लिम आहे म्हणून हिंदी मालक मला भाड्याने घर देऊ इच्छित नाहीत. काही मालकांना मला मिळणाऱ्या राजकीय धमक्यांची समस्या आहे. मुंबईत भाड्याने घर शोधणे खूप अवघड आहे. असे उर्फीने ट्विट केले आहे.

काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने राजीनामा दिल्याने खळबळ

हे ट्विट चर्चेत असून नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. एक युजर प्रतिक्रिया देत म्हणाला, ‘तू असे विचित्र कपडे घालण्याआधी सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे होता’, अशा अनेक प्रतिक्रिया या ट्विटवर येत आहेत.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील रस्ता आज बंद

Spread the love
Exit mobile version