Site icon e लोकहित | Marathi News

Chandgaon: चांडगावमध्ये नवरात्रउत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Navratri festival is celebrated with great enthusiasm in Chandgaon

श्रीगोंदा: चांडगाव ता.श्रीगोंदा येथे शारदीय नवरात्रउत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला आहे. गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळे या उत्सवात खंड पडला होता. पण यंदाच्या वर्षी कोरोना कमी झाल्याने पारंपरिक पद्धतीनुसार नवरात्रउत्सव साजरा करण्यात आला.

Hiradgaon: हिरडगावमध्ये नवरात्रउत्सव उत्साहात साजरा

चांडगावमध्ये एकाच देवीचे तीन मंदिरे आहेत. तिन्ही मंदिरामध्ये नवरात्रउत्सव एकत्रित साजरा केला जातो. तुकाईदेवीच्या तिन्ही मंदिरांमध्ये ग्रामस्थ आणि पुजारी घटस्थापना करतात. रोज देवीची भव्य आरती होते यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. नऊ दिवस देवीच्या मंदिरामध्ये वेगेवेगळे कार्यक्रम राबविले जातात. त्याचबरोबर सातव्या माळेला देवीला रात्री बारा वाजता ओल्या कपड्याने अंघोळ घातली जाते.

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान पुरात 8 जण बुडाले तर 40 लोक बेपत्ता

दसऱ्याच्या दिवशी देवीच्या पालखीची मिरवणूक होते यासाठी गावातील असंख्य लोक उपस्थित असतात. ही पालखी मिरवणूक बाभळीच्या काट्यातून जाते. देवीची पालखी काट्यातून जात असताना कोणालाही कसल्याही प्रकारची इजा होत नाही. या पालखी सोहळ्याचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य समजले जाते. पालखी सोहळ्यामध्ये गुलालाची उधळण होते तसेच फटाक्यांची आतषबाजी केली जाते.

धक्कादायक! दुर्गा पूजेला बकऱ्याच्या ऐवजी चिमुकल्याचाच गेला बळी, वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version