Site icon e लोकहित | Marathi News

शिवसेना गमावल्यानंतर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं; म्हणाल्या, “ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन…”

Navneet Rana scolds Uddhav Thackeray after losing Shiv Sena; She said, "Thaker went with Eknath Shinde..."

मागील काही महिन्यांपासून शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू होते. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून शिवसेना (Shivsena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. आता यावर अमरातीच्या खासदार नवनीत राणा (Navnit Rana) यांनी भाष्य केले आहे.

बिग ब्रेकिंग! पुण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा

नवनीत राणा म्हणाल्या, ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जिवंत ठेवावा, असे अमरावतीच्या नवनीत राणा म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर शिवसेना भवन देखील शिंदे गटालाच मिळणार असा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना आव्हान; म्हणाले, “मर्द असाल तर…”

त्याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या, “अजूनही वेळ गेलेली नाही उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला जिवंत ठेवायचे असेल, तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायला हवे,” असा सल्ला देखील नवणीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.

VIDEO: महाशिवरात्रीनिमित्त अमृता फडणवीस यांनी इंस्टाग्रामवरून शेअर केलं गाणं; नेटकरी संतापून म्हणाले…

Spread the love
Exit mobile version