
नरेंद्र मोदी आज मुंबईच्या (Mumbai) दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी अनेक सेवांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात येणार आहे. आज त्यांच्या दौऱ्यानिमित्त मुंबईमध्ये बीकेसी मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आले आहे. आता या सभेमध्ये नरेंद्र मोदी काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्रेकिंग! कार आणि ट्रकचा भीषण अपघात; ९ जण जागीच ठार
यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेमध्ये एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल.”
धक्कादायक! शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतच ठेवलं कोंडून
मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल.
— Narendra Modi (@narendramodi) January 18, 2023
सध्या नरेंद्र मोदी यांचे ट्विट खूप चर्चेत आहे. खासकरून मराठी भाषेमध्ये ट्विट केल्यामुळे हे ट्विट चांगलेच चर्चेत आहे. अनेक नेत्यांनी यावं ट्विटवर प्रतिक्रिया देत मुंबईत स्वागत केले आहे.