
Mumbai News : पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या धक्कादायक घटना देखील समोर आल्या आहेत. दरम्यान मागच्या काही दिवसापूर्वी देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वे खोळंबल्याने बाळाची आई आणि आजोबा रुळावरून चालत असताना आजोबांच्या हातातून बाळ निसटून पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेनंतर सगळीकडे खळबळ उडाली होती. आता या घटनेबाबत त्या बाळाच्या आजोबांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं त्यावेळी काय घडलं? याबाबत आजोबांनी माहिती दिली आहे.
Mumbai landslide । लोक झोपेत असतानाच इमारतीवर कोसळली दरड, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
याबाबत बोलताना बाळाचे आजोबा म्हणाले, पावसामुळे रेल्वेचा मोठा प्रॉब्लेम होता त्यामुळे आम्ही कल्याण स्टेशनवर चालत निघालो होतो. जेव्हा आम्ही ट्रेनमधून पहिल्यांदा उतरलो त्यावेळी माझी मुलगी योगिता त्याठिकाणी घसरून पडली त्यानंतर मी तिला कसं बस सावरलं आणि तिच्याकडे जे बाळ होतं ते माझ्याकडे घेतलं आणि पुढे चालू राहिलो. यावेळी पुढे चालत असताना वाटेवरून जाताना माझा पाय घसरला आणि माझ्या हातातून बाळ नाल्यात पडल्याचं आजोबांनी सांगितलं आहे.
Havaman Andaj : मोठी बातमी! राज्यभर पावसाचा जोर अजून वाढणार; नेमकं काय आहे कारण?
ट्रेन कल्याण डोंबिवली दरम्यान खूप वेळ थांबली होती आणि त्या ठिकाणी लोक उतरून पुढे जात होती. त्यामुळे आम्ही देखील ठरवलं आपणही पुढे जाव. जर भिवंडीत आरोग्य सुविधा व्यवस्थित असत्या तर आज अशी वेळ आली नसती असे देखील या आजोबांनी सांगितला आहे. ते गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या बाळाला वाडिया रुग्णालयामध्ये तपासणी करण्यासाठी घेऊन जात आहेत. आणि त्या दिवशी नेमकी तपासणीची तारीख होती त्यामुळे त्यांना जावेच लागले.
CSK Captaincy । चेन्नईचा भावी कर्णधार कोण? धोनीच्याच जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा