
Mla Lasya Nanditha । तेलंगणातील सिकंदराबाद कँट मतदारसंघातील बीआरएस आमदार लस्या नंदिता यांचा शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्या फक्त 36 वर्षांच्या. हैदराबादमधील नेहरू आऊटर रिंग रोडवर त्यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यांचा कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.
Sharad Pawar । शरद पवार यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी!
आमदार लस्या नंदिता यांच्यासोबत झालेल्या या अपघातात त्यांच्या चालकालाही गंभीर दुखापत झाली आहे. संगारेड्डीतील अमीनपूर मंडल परिसरातील सुलतानपूर आऊटर रिंग रोडवर कारचे नियंत्रण सुटले आणि दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. लस्या नंदिता सिकंदराबाद कॅन्टच्या आमदार आहेत. याच्या काही दिवसांपूर्वीच त्या एका अपघातातून थोडक्यात बचावल्या होत्या.
चंद्रशेखर राव यांनी शोक व्यक्त केला
बीआरएस प्रमुख के चंद्रशेखर राव यांनीही नंदिताच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्या शोकग्रस्त कुटुंबाला पक्षाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, 1986 मध्ये हैदराबादमध्ये जन्मलेल्या लस्या नंदिता यांनी सुमारे दशकभरापूर्वी राजकारणात प्रवेश केला. 2023 च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सिकंदराबाद कॅन्टोन्मेंटमधून आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी त्यांनी कवडीगुडा प्रभागात नगरसेवक म्हणून काम केले.