
श्रीगोंदा : मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra ) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान मंत्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीगोंदा तालुक्यातील वेळु, चिखलठाणवाडी, कणसेवाडी आणि शंकरनगर (पेडगाव) या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
दिलासादायक! आता ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 718 कोटी मदत देण्यास सुरु
तसेच मंत्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पेडगाव येथे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांसमवेत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून लवकरात लवकर मदत करण्याचे आश्वासन दिले.
एसटीवर अनधिकृत जाहिराती लावताय? तर सावधान, आता दंडासह गुन्हाही दाखल होणार
यावेळी आमदार श्री बबनरावजी पाचपुते, जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी श्री. सुधाकर भोसले, तहसीलदार श्री. मिलिंद कुलथे, श्री. भगवान (आबा) पाचपुते, श्री. रमेश (तात्या) गिरमकर, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. संदीप नागवडे सर इत्यादी उपस्थित होते.
काय सांगता! अयोध्येत लागलेल्या दिव्यांमधले तेल घेण्यासाठी गरीबांची धावपळ, समोर आल कारण