
Maratha Reservation । मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात सभागृहात चर्चा करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे सरकारही यावर सभागृहात चर्चा करण्याच्या तयारीत असून मंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात चर्चा होणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकर चप्पलफेक प्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती
काय म्हणाले सामंत?
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांची भेट घेतली असता मराठा आरक्षणावर सभागृहात चर्चा होईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे सोमवारी किंवा मंगळवारी चर्चा होणार आहे.” मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ही चर्चा होणार आहे. या चर्चेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अनेक गोष्टी सांगतील. मात्र, मनोज जरंगे यांनी केलेली पहिली मागणी आम्ही पूर्ण केली आहे. काम सुरू असून निजाम काळात सापडलेल्या नोंदीनुसार कुणबी दाखले दिले जात आहेत.
Accident News । क्षणात सर्वकाही उध्वस्त झालं! कार आणि बाईचा भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर
मुंबई महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मुंबईतील जुहू चौपाटीला भेट देऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. याच कारणावरून आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, आदित्य ठाकरे काय विचार करतात यापेक्षा मुंबईकरांना काय वाटते हे महत्त्वाचे आहे. मुंबई स्वच्छ करण्यासाठी एकही मुख्यमंत्री रस्त्यावर उतरला नाही, अशी लोकांची प्रतिक्रिया आहे.