
Manoj Jarange Patil । सध्या महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला दिसत आहे. यामध्येच आता 24 डिसेंबर पर्यंत जर आरक्षणाबाबत कोणता ठोस निर्णय घेतला नाही तर त्यानंतर महाराष्ट्र मराठा काय चीज आहे. हे लक्षात येईल. त्याचबरोबर आमच्या लेकरांच्या हितासाठी मराठा आरक्षण खूप महत्त्वाच आहे. आम्ही नेत्यांना मोठे केले आहे. ते आमच्या विरोधात जायला लागले तर आम्हाला त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही. असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये मराठा समाजाबाबत सरकार काय भूमिका मांडता हे देखील आम्ही बारकाईने पाहतोय. माझा समाज जरी गरीब असला आणि शेतात राबवत असला तरी अधिवेशनात तुम्ही काय भूमिका मांडत आहात हे आम्ही निरीक्षण करतोय. 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण न दिल्यास मराठा समाज काय आहे हे तुम्हाला दिसेल. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
त्याचबरोबर, “आजपर्यंत मी जे काही बोलतोय ते खरे करून दाखवले त्यामुळे पुढे मराठा आणि महाराष्ट्र काय हे 14 डिसेंबर नंतर यांना कळेल. यानंतर एवढा पश्चाताप होईल की हा विषय आपण सोडवायला हवा होता आता मात्र खेळ विचित्र झाला आहे. काय समजायचे ते समजा.. शेवटी आमचा संयम बघायला लागला तर आमचा नाईलाज आहे”. असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.