
Manoj Jarange Patil । मराठा आरक्षण आंदोलन निर्णयाक टप्प्यावर असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या सहकार्यांकडूनच गंभीर आरोप केले जात आहेत. काल मनोज जरांगे पाटील यांचे जिवलग मित्र अजय बारस्कर यांनी गंभीर आरोप केले. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली. त्यानंतर आता एका महिला आंदोलकाने मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Sanjay Raut । “…म्हणून पवारांचे घड्याळ काढून घेतलं” नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
मराठा आंदोलनकर्त्या आणि मनोज जरांगे यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या म्हणण्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील वागतात. असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे.
Bjp । महाराष्ट्रातील लोकसभेच्या या जागांवर भाजप कधीही घोषणा करू शकते, उमेदवारांची नावे निश्चित
शरद पवार सांगतात तसेच मनोज जरांगे पाटील करतात. शरद पवार यांचाच फोन जरांगे पाटील यांना येत होता. मराठ्यांना आरक्षण मिळत होतं म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला. पुण्यामध्ये जरांगे पाटील यांचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीच लावले होते. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत. असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला आहे.
Accident News । अंगावर काटा आणणारा अपघात; नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली; ६ जणांचा भयानक अंत
त्याचबरोबर पुढे बोलताना संगीता वानखेडे म्हणाल्या, “मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना जरांगे विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवारांचा होता असं संगीता वानखडे म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता सगळीकडे याचीच चर्चा होत आहे.