
Manikrao Kokate । राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सध्या मोठ्या वादात सापडले आहेत. विधानभवनात रमी खेळताना त्यांचा व्हिडीओ समोर आल्याने विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असतानाच, त्यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे नव्या राजकीय खळबळीला सुरुवात झाली आहे.
Manikrao Kokate । रमीचा डाव उघडा पडला? कोकाटेंचे आणखी धक्कादायक व्हिडीओ बाहेर
पत्रकार परिषदेत बोलताना कोकाटे म्हणाले, “हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा दिला. म्हणजे भिकारी कोण? सरकारच ना?” या विधानामुळे अनेकांना धक्का बसला असून विरोधकांनी सरकारच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
या विधानानंतर कोकाटेंनी आपली बाजू मांडताना सांगितले की, त्यांनी कृषी खात्यात अनेक ठोस निर्णय घेतले आहेत. “माझ्या काळात बोगस अर्ज सापडले, ते मी तात्काळ रद्द केले. मी ५२ शासन निर्णय (GR) काढले, अनेक संशोधन केंद्रांना भेट दिली, आणि बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या,” असे ते म्हणाले. तसंच त्यांनी हवामान केंद्रांची मागणी प्रत्येक गावात केली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
रमी खेळाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सुरू झालेल्या राजीनाम्याच्या मागणीबाबत कोकाटे म्हणाले, “राजीनामा देण्यासारखं काय घडलंय? मी काही चोरी केली नाही, गुन्हा केला नाही. ज्याने व्हिडीओ काढला, त्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे,” असे सांगत त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.
Jayant Patil । राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप! जयंत पाटील यांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
कोकाटे म्हणाले की, “मी २५ वर्ष विधानसभेत आहे, मला नियम माहिती आहेत. काही वेळेस मोबाईलमध्ये अँड्रॉइड टचमुळे काही चुकलं असेल. त्यामुळे अनावश्यक मुद्दा मोठा केला जात आहे.”