Site icon e लोकहित | Marathi News

ऑन ड्युटी रिल्स बनवने महिला कंडक्टरला पडले चांगलेच महागात; एसटी महामंडळाकडून निलंबन

Making on-duty reels cost women conductors dearly; Suspension from ST Corporation

सध्या सर्वजण मनोरंजन म्हणून रिल्स (Reels) बनवत असतात. पण आता हेच रिल्स बनवणे एका महिला कंडक्टरला चांगलेच महागात पडले आहे. कळंबमधील एसटी महामंडळामध्ये कंडक्टर असणाऱ्या मंगल सागर गिरीवर (Mangal Sagar Giri) या महिलेला ऑन ड्युटी रिल्स काढल्यामुळे एसटी महामंडळाकडून निलंबित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली! कापूस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात होणार मोठी घट

मंगल सागर गिरीवर या महिला कंडक्टरचे लाखो फॉलोवर्स आहेत. ही महिला एसटी चालू असताना रिल्स बनवायची. त्याचबरोबर ती प्रवाशांसोबत देखील रिल्स बनवायची पण ड्युटीवर असताना व्हिडीओ काढून व्हायरल करणे त्या महिलेला चांगलेच महागात पडले आहे. त्याचबरोबर तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तिच्या सहकार्याला देखील निलंबित करण्यात आले आहे.

धक्कादायक! नवरात्रीनिमित्त घातलेल्या मंडपाला आग लागून दोन जणांचा मृत्यू तर, ६४ जण होरपळले

दरम्यान, तिच्या या व्हिडिओंला सोशल मीडियावर खूप लाईक्स आणि कमेंट्स येत असतात. मागच्या काही दिवसांपूर्वी तिने कंडक्टरचा ड्रेस घालून तुळजाभवानीच्या एका गाण्यावर व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाला होता. मात्र, एसटी महामंडळाची प्रतिमा मालिन झाल्याचे कारण देत महिलेचे निलंबन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! २० ऑक्टोबरपर्यंत मिळणार ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान, वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version