
आजकाल बनावट कागदपत्रे ( Fake Documents) बनवून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान बारामती (Baramati) येथे बोगस रेशनकार्ड काढत शासनाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. वडिलांच्या रेशनकार्ड मधले नाव कमी न करता स्वतःचे वेगळे रेशनकार्ड काढून त्याद्वारे शासकीय धान्य घेऊन एका व्यक्तीने फसवणूक केली आहे.
ब्रेकिंग! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ रुपयांनी एलपीजी गॅस सिलेंडर दरात वाढ
या प्रकरणी संदीप धनंजय भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडजचे तलाठी अशपाक हनिफ इनामदार यांनी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चोपडजमधील हनुमंत गाडेकर यांनी भोसले यांच्या बोगस रेशनकार्डाबाबत बारामतीच्या तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती.
ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर; कोण होणार विकेटकीपर?
यानुसार संदीप भोसले यांची चौकशी करण्यात आली आहे. भोसले हे मूळचे कानवाडी येथील रहवाशी असून त्यांचे वडील धनंजय भोसले यांच्या रेशनकार्डवर संदिप यांचे नाव समाविष्ट आहे. तरी देखील ते नाव कमी न करता त्यांनी पत्नी मनिषा यांच्या नावे केशरी रेशनकार्ड मिळवले.
या रेशनकार्डचा वापर करून त्यांनी स्वस्त धान्य दुकानातून, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत देण्यात येणारे धान्य घेऊन शासनाची फसवणूक केली आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची कारवाई सुरू आहे.
शेतकरी सुद्धा हेलिकॉप्टरमधून शेतात जाणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा