Rakhi Sawant: “मला मुख्यमंत्री बनवा”, राखी सावंतने केली अजब-गजब मागणी, व्हिडिओ व्हायरल

"Make me Chief Minister", Rakhi Sawant made a strange demand, the video went viral

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाते. राखी ही टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. राखी सावंत सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. इतकंच नाही तर राखी सावंत लोकांचे मनोरंजन करण्यात आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात नेहमीच अग्रेसर असते. दरम्यान अशातच आता राखी सवांतचा तिचा एक व्हिडीओ (video) इंटरनेटवर व्हायरल होत आहे .या व्हिडिओमध्ये ती चक्क मुख्यमंत्री (Chief Minister) होण्याचे स्वप्न व्यक्त करताना दिसत आहे. इतकंच नाही तर या व्हिडीओमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm modi) आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांचा उल्लेख केला आहे.

Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगींनी अयोध्येतील राम मंदिराबाबत दिली महत्वाची माहिती

मला या देशाचं मुख्यमंत्री बनवलं, तर….

राखी सावंतने या व्हिडीओमध्ये तिला मुख्यमंत्री बनवल्यास काय काय करायचय याविषयी सांगितले आहे. व्हिडीओमध्ये ती म्हणाली की, ‘मला या देशाचं मुख्यमंत्री बनवलं, तर ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या गोऱ्या गालांसारखे आणि त्यांच्या कंबरे सारखे रस्ते बनवीन. तसेच पुढे ती म्हणाली की, आपल्या भारतात प्रत्येक रस्त्यावर खूप खड्डे आहेत. पण तुम्ही या रस्त्यांकडे गंमतीत पाहू नका. कारण मोदीजी चहा बनवता बनवता पीएम झाले, तर मी बसल्या बसल्या आणि हसता हसवता सीएम का होऊ शकत नाही?’ राखी सावांतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या.

धनुष्यबाण चिन्ह नेमक कोणाचं? फैसला पडला लांबणीवर

याआधी हेमा मालिनी यांनी घेतले होते राखीचे नाव

याआधी हेमा मालिनी यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. दरम्यान या व्हिडीओमध्ये त्यांनी राखी सावंतच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल वक्तव्य केलं होतं. हेमा मालिनी यांच्या या व्हिडीओवर राखी सावंत प्रतिक्रिया देताना म्हणाली की, ‘आज मी खूप आनंदी आहे, कारण मला गुपित कळाले की 202 2मध्ये मी निवडणूक लढवणार आहे. इतकंच नाही तर याबाबत पंतप्रधान मोदीजी आणि आमचे अमित शाहजी यांची घोषणा करणार होते. परंतु मी भाग्यवान आहे कारण माझ्या आवडत्या अभिनेत्री ड्रीमगर्ल हेमा मालिनीजी यांनी यावेळेस मी निवडणुकीत उभी आहे, अशी घोषणा केली आहे.

चक्क कला शाखेच्या विद्यार्थ्याने बनवला शेतीच्या फवारणीसाठी ड्रोन, 10 मिनिटात एक एकरावर करणार फवारणी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *