Site icon e लोकहित | Marathi News

दौंड तालुका प्लास्टिकमुक्त करू – वासुदेव नाना काळे

Make Daund taluka plastic free - Vasudev Nana Kale

दौंड : पर्यावरणाच्या हानीला प्लॅस्टिकचा अतिरिक्त वापर हे एक प्रमुख कारण असल्याने देशाचे पंतप्रधान मोदी यांचा प्लॅस्टीकमुक्तीचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दौंड तालुक्यातील रोटी ग्रामस्थांनी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ इत्यादीसाठी होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन प्लॅस्टिकपासून होणार प्रदुषण टाळण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप केले.

धक्कादायक घटना, चेंबरमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू

नागरिकांचा प्लास्टिकचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे त्यामुळे प्रदूषणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. प्लॅस्टिकचं विघटन होत नसल्याने जनावरांच्या खाण्यात आल्याने पोटाचे त्रास होतात. प्लॅस्टिकमुळे अनेक जनावरांचा मृत्यूही होतात. शहरांमध्ये अनेक वेळा गटरीमध्ये प्लॅस्टिक अडकल्याने गटरी तुंबल्याने अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहेत. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने त्यावर निर्बंध घातले आहेत. परंतु याची अंमलबजावणी होतं नाही नागरिकांकडून प्लास्टिकचा सर्रास वापर होत आहे. म्हणून प्लॅस्टिक बंदीचा पंतप्रधान नरेंद्र मोदीं दिलेला संदेश गावपातळीवर पोहोचवा यासाठी रोटी ग्रामस्थांनी कापडी पिशव्यांचे वाटप केले. प्लॅस्टिक मुक्त गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देशात चळवळ उभी रहावी अशी भावना वासुदेव काळे यांनी कापडी पिशवीच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केल्या.

खुशखबर! शेतकऱ्यांना कुट्टी मशिनसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; वाचा सविस्तर

यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जेष्ठ नेते शिवाजी निंबाळकर (Shivaji Nimbalkar) उपस्थित होते. त्याचबरोबर रोटी येथील नवनाथ साळुंखे, योगेश शितोळे, सर्जेराव शिंदे, दामोदर जगताप, प्रकाश जाधव, दत्तात्रय जगताप, भरत जाधव, दत्तात्रय शिंदे, करण शितोळे, अभिजीत भागवत आणि गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

आज वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस, जाणून घेऊया आजच महत्व

Spread the love
Exit mobile version