
Maharashtra Winter Session । महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते २० डिसेंबर दरम्यान होणार आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. राज्याची दुसरी राजधानी असलेल्या नागपुरात हे अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 20 डिसेंबर रोजी संपेल,” असे विधान भवन येथील राज्य विधिमंडळ संकुलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
Weather News । सावधान! पुढील काही तास महत्त्वाचे! देशातील काही राज्यांवर चक्रीवादळाचा धोका निर्माण
त्यांनी सांगितले की, ठरलेल्या वेळापत्रकानुसार अधिवेशनात 10 कामकाजाचे दिवस असतील. मराठा आरक्षण, अवकाळी पाऊस, राज्यातील गुंतवणूक आणि अन्य मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला घेरण्याची अपेक्षा आहे. (Maharashtra Winter Session)
Mumbai Cylinder Blast । मोठी दुर्घटना! मुंबईत सिलेंडरच्या स्फोटामुळे पाच घरांची पडझड, चार जण जखमी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार का?
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार की नाही, यावर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोरे यांनी आपले वक्तव्य केले आहे. अधिवेशनात या विषयावर चर्चा होणार का, या प्रश्नावर गोरे म्हणाले की, अद्याप कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित होईल यात शंका नाही. पण सर्व काम आणि इतर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मी तारीख जाहीर करू शकत नाही. असं त्या म्हणाल्या आहेत.