Site icon e लोकहित | Marathi News

Mahadevi Elephant | महादेवी हत्तीणीसंदर्भात महत्वाची बातमी समोर; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

Mahadevi Elephant

Mahadevi Elephant | कोल्हापुरात गेल्या काही आठवड्यांपासून महादेवी हत्तीणीच्या पुनरागमनासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळताना दिसत आहे. राज्य सरकारने हत्तीण परत आणण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलत, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, महादेवी हत्तीण वनतारा रेस्क्यू सेंटरला पाठवण्याचा निर्णय सरकारचा नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आधारित होता. मात्र कोल्हापूरच्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकार आता त्या आदेशावर पुनर्विचार करण्याची विनंती करणार आहे. यासाठी नांदणी मठाकडून स्वतंत्र याचिका दाखल केली जाणार असून, त्याला राज्य सरकारकडूनही पाठिंबा दिला जाणार आहे.

Satyapal Malik । सर्वात मोठी बातमी! माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन; राजकारणात शोककळा

हत्तीणीच्या आरोग्य आणि काळजीसाठी डॉक्टरांची विशेष टीम तयार करण्यात येणार असून, आहार, औषधोपचार, आणि व्यवस्थापनासाठी ठोस योजना सुप्रीम कोर्टात मांडली जाणार आहे. त्यामुळे हत्तीणीची निगा राखली जाईल, असा सरकारचा दावा आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, राजू शेट्टी, सतेज पाटील, तसेच नांदणी मठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Spread the love
Exit mobile version