Kamalnath । मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांना मोठा फटका! काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरुन डच्चू

Kamalnath

Kamalnath । नुकत्याच मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) पार पडल्या. निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव सहन करावा लागला. पराभवानंतर काँग्रेसच्या (Congress) मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मध्य प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाची (Madhya Pradesh Congress State President) पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी आता राज्यात नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. (Latest Marathi News)

Pune Accident News । ट्रक आणि कारचा पुण्यात भीषण अपघात! दोन जणांचा जागीच मृत्यू तर दोन वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी

माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जितू पटवारी (Jitu Patwari) यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस (संघटना) के.सी. वेणुगोपाल (K.C. Venugopal) यांनी माहिती दिली आहे. त्याशिवाय उमंग सिंघर यांना विधीमंडळ पक्षाचं प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे तर हेमंत कटारे यांची मध्य प्रदेशच्या उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. (MP Congress State President)

Bjp । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! भाजप नेत्याची गोळ्या झाडून करण्यात आली हत्या

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने नियुक्त्या केल्या आहेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जितू पटवारी यांना राऊ विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा उमेदवाराकडून ३५ हजार मतांनी पराभूत व्हावे लागले. यापूर्वी पटवारी यांनी उच्चशिक्षण, क्रीडा आणि युवककल्याण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती.

Accident News । भीषण अपघात! ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट चहा टपरीवर आदळली; ३ जणांचा जागीच मृत्यू

Spread the love