Site icon e लोकहित | Marathi News

Lumpy: लम्पी रोगाचा राज्यात धुमाकूळ! ‘या’ जिल्ह्यात मनुष्यबळ कमी, तरी लसीकरणात अव्वल

Lumpy disease in the state! Manpower less in this district, but top in vaccination

गेल्या महिन्याभरापासून राज्यात लम्पी त्वचारोगाने (Lumpy disease) धुमाकूळ घातला आहे. दरम्यान या रोगावर उपाययोजना म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून (Animal Husbandry Department) लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. खरतर
मनुष्यबळाचा अभावाने जनावरांचे लसीकरण (Vaccination) शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्‍टरांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दरम्यान लसीकरण मोफत करण्यात येत असून राज्यात नगर (Nagar)जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे.

Ranbir-Alia: ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीने रणबीर-आलियाला दिला सल्ला म्हणाली, “लग्नानंतर चांगलं सेक्स करा आणि…”,

मंगळवारी जिल्ह्यात तब्बल 64 हजार जनावरांचे लसीकरण झाले असून आतापर्यंत 5 लाख 31 एवढे लसीकरण करण्यात आले आहे. मनुष्यबळ कमी असले तरी पशुसंवर्धन विभागातील अन्य 27 कर्मचाऱ्यांवर देखील लसीकरणाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्‍त डॉ. सुनील तुंबारे यांनी खासगी व शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा गट करून लम्पी रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

BMC: मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांची परवानगी नाकारली

सध्या 248 शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी व 446 खासगी डॉक्‍टरांमार्फत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या पशुसंर्वधन विभागाची 44 पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पद रिक्‍त आहेत. तर पशुधन विकास अधिकाऱ्यांची दोन अशी 46 पदे रिक्‍त असून ती तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Oily Skin: तेलकट चेहऱ्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय; होईल फायदा, वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version