
Lok Sabha Elections । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांनी विविध उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने देखील लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीने 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात प्रामुख्याने रायगड,भिवंडी उस्मानाबाद, जळगाव, पालघर आणि मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. (Vanchit Bahujan Aghadi Candidates list)
वाचा वंचित बहुजन आघाडीच्या पाचव्या यादीतील लोकसभेचे उमेदवार
१) रायगड – कुमुदिनी रविंद्र चव्हाण
२) उस्मानाबाद- भाऊसाहेब रावसाहेब अढळकर
३) दिंडोरी – गुलाब मोहन बर्डे
४) भिवंडी – निलेश सांबरे
५) मुंबई उत्तर पश्चिम – संजीव कुमार अप्पाराव कलोकोरी
६) पालघर – विजया दहिकर म्हात्रे
७) नंदूरबार – हनुमंत कुमार मनराम सुर्यवंशी
८) मुंबई उत्तर – बीना रामकुबेर सिंग
९) जळगाव – प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा
१०) मुंबई दक्षिण मध्य – अब्दुल हसन खान