Lok Sabha Elections २०२४ । लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या देखील पुण्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनि मंत्री दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का दिल्याची माहिती समोर आली आहे. दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी शेखर पाचुंदकर यांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. यामुळे वळसे पाटलांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शेखर पाचुंदकर यांच्यासह देवदत्त निकम आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. सध्या लोकसभा निवडणुकांची सगळीकडे धामधूम पाहायला मिळत आहेत. मात्र निवडणुकीच्या तोंडावरच दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शेखर पाचुंदकर (Shekhar Pachundkar) हे शिरूर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Lok Sabha Constituency) आंबेगाव तालुक्यातील 42 गावांचे प्रमुख आहेत.
Sharad Pawar । शरद पवारांची मोठी खेळी, भाजपला धक्का
शेखर पाचुंदकर आणि देवदत्त निकम यांनी पदाधिकाऱ्यांसह शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिरूर या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद वाढली आहे त्याचबरोबर इथून पुढे शेखर पाचुंदकर हे आता शरद पवार गटाचे शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा प्रचार करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यांच्यावर आंबेगाव विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.