Lok Sabha Elections २o२४ । लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला बसला सर्वात मोठा धक्का!

Mahavikas Aghadi

Lok Sabha Elections २०२४ । लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान, सध्या रायगड लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याची माहिती मिळत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते रमेश मोरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Politics News । लोकसभेपूर्वी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

रमेश मोरे हे माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यांनी अचानकच शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे रायगड मध्ये महाविकास आघाडीला धक्का बसला असून महायुतीची ताकद वाढली आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.

Ajit Pawar । मुख्यमंत्री केव्हा होणार? कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला अजित पवारांनी दिलं उत्तर

दरम्यान, मागच्या काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मोर्बे या ठिकाणी सभा घेतली होती. या सभेचे संपूर्ण नियोजन रमेश मोरे यांनी केले होते. त्याचबरोबर या सभेसाठी त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी जमवाजमव देखील केली होती. मात्र सध्या त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे

Viral News । लग्नाच्या दिवशी केली ही सर्वात मोठी चूक; नवरीने थेट लग्नच मोडले

Spread the love