
सुरक्षित आर्थिक गुंतवणूक ही काळाची गरज आहे. भारतीय आयुर्विमा मंडळाच्या योजना आर्थिक गुंतवणुकीसाठी अधिक सोयीस्कर समजल्या जातात. LIC सरल पेन्शन योजना ही यातीलच एक योजना आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. ही एक नॉन लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपेट घेणारी आगाऊ सिंगल प्रीमियम ( Single premium) योजना समजली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये ५ टक्के अँन्युइटी दराची हमी दिली जाते. याशिवाय यामध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक पेआऊट निवडण्याचा पर्याय आहे. (Saral Pension Plan)
धक्कादायक घटना! केरळमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली; 15 जणांचा बुडून मृत्यू
LIC च्या अधिकृत संकेतस्थळावर या योजनेबाबत माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, ४० ते ८० वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. यामध्ये पॉलिसीधारक किमान १००० रुपयांची मासिक पेन्शन किंवा १० हजार रुपयांची वार्षिक पेन्शन निवडू शकतो. यासाठी २.५० लाखांचा एकरकमी प्रीमियम भरावा लागतो. तसेच १० लाखांच्या कमाल प्रीमियम गुंतवणुकीवर ५०,२५० रुपयांची वार्षिक पेन्शन मिळते.
Ajit Pawar । अजित पवार ऑन फायर! म्हणाले, “राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरं काय येतं?”
सरल पेन्शन योजना पॉलिसीधारकाच्या संपूर्ण आयुष्यापर्यंत दिली जाते. म्हणजेच पॉलिसीधारक मरेपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यामुळे यामध्ये मॅच्युरिटी बेनिफिट नाही. मात्र यामध्ये exit प्लॅन आहे.याअंतर्गत तुम्ही पेन्शन सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनी बाहेर पडू शकता. तसेच गरजेच्या वेळी तुम्हाला यातून कर्जसुद्धा मिळू शकते.
Wtc Final 2023 | टीम इंडियाला मोठा दिलासा; केएल राहुलच्या जागी ‘या’ दिग्गज खेळाडूची निवड