Laxman Hake | मोठी बातमी! लक्ष्मण हाकेंच्या गंभीर आरोपांनी राजकारणात खळबळ

Laxman Hake

Laxman Hake | मराठा आरक्षणाबाबत सरकारने मनोज जरांगे यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करून जीआर काढला आहे. यामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले असून मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण असले तरी आता राज्यातील ओबीसी समाजामध्ये प्रचंड रोष उसळलेला आहे. ओबीसी नेत्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

या सर्व घडामोडी घडत असतानाच ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात देखील मोठी खळबळ उडाली आहे. लक्ष्मण हाके यांनी आरोप केले आहेत की, पवार कुटुंबियांनी ओबीसींचे आरक्षण संपवले. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचा थेट पाठिंबा जरांगे आंदोलनाला होता. असे आरोप त्यांनी केले आहेत. यामुळे आता सगळीकडे खळबळ उडाली आहे.

याबाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, “मराठ्यांच्या कायदा नसलेल्या आंदोलनाला उभं करायचं काम हे शरद पवारांनी केलं. सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनावणे (Bajrang sonawane) यांनी थेट सपोर्ट केला. यामध्ये कोण माणसं पुरवत होतं, कोण गाड्या देत होतं, कोण पत्रकार परिषदा घेत होतं हे सगळं सर्वकाही ओबीसी समाजाला माहिती आहे अस ते म्हणाले आहेत.

Spread the love