Site icon e लोकहित | Marathi News

Independence Day : कोहली आणि अनुष्काने आपल्या घरी फडकवला राष्ट्रध्वज! पोस्ट शेअर करत लिहिले…

Kohli and Anushka hoisted the national flag at their home! Sharing the post wrote…

मुंबई : भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी राष्ट्रध्वजासह एक फोटो शेअर करून राष्ट्रीय सण साजरा केला.

अनुष्काने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहोत, जगभरातील सर्व भारतीयांना #IndependenceDay च्या खूप खूप शुभेच्छा!’ ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत कोहली आणि अनुष्काने त्यांच्या राहत्या घरी राष्ट्रध्वज फडकावला आहे.

याशिवाय विराट कोहलीनेही ट्विट करून लोकांना १५ ऑगस्टच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोहलीने ट्विटमध्ये लिहिले की, ’75 गौरवशाली वर्षे. भारतीय असल्याचा अभिमान आहे. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद’.

Spread the love
Exit mobile version