Site icon e लोकहित | Marathi News

चिमुकल्यांनी उडवली शिंदे गटाची खिल्ली; म्हणाले, “आले रे आले गद्दार आले, ५० खोके एकदम ओके”

Kids make fun of Shinde group; Said, "Ale Re Ale Gaddar Ale, 50 boxes are ok"

मागच्या काही महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेसोबत गद्दारी केली आणि भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यानंतर उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले आणि एकनाथ शिंदे यांनी मुखमंत्री पदाची शपथ घेतली. नंतर ठाकरे गट व शिंदे गट असे दोन गट पडले. यांनतर ठाकरे गटातील नेते सतत शिंदे गटावर गद्दार म्हणून टीका करतात. दरम्यान आता काही चिमुकल्यांनी देखील शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे.

ब्रेकिंग! पुण्यात अचानकपणे अवकाळी पावसाला सुरवात

सध्या सगळीकडे होळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. काही शेतकरी तर कांद्याला भाव नसल्याने कांद्याची होळी साजरी करत आहेत. यामध्येच आता बीड जिल्ह्यातील परळी येथे मुलांनी होळीच्या निमित्ताने “आले रे आले गद्दार आले, ५० खोके एकदम ओके” अशी घोषणा केली. त्याचबरोबर एका मुलाच्या पाठीवर ५० खोके एकदम ओके असे देखील लिहिलेले आहे.

अंबानींच्या पर्सनल ड्रायव्हरला महिन्याला मिळतो ‘इतका’ पगार; ऐकून थक्क व्हाल?

सध्या या मुलांची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. होळीवर बोंबा मारण्याऐवजी या चिमुकल्या मुलांनी अंगावर आणि पाठीवर गद्दार, ५० खोके एकदम ओके लिहून ही होळी साजरी केली. यामुळे सगळ्यांचे लक्ष या मुलांकडे लागले आहे. या मुलांचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

“आपण कसबा जिंकू याची मला खात्री नव्हती पण…” शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Spread the love
Exit mobile version