
मकर संक्रात जवळ आली की सर्वत्र पतंगोत्सव सुरू होतो. मात्र याकाळात अनेक अपघात घडतात. पतंगाचा मांजा लागून दुखापत होणे, पतंगाच्या मागे धावताना अपघात होणे अशा घटनांमुळे पतंग उडवणे ( Kite Playing) धोक्याचे ठरत आहे. दरम्यान नागपूरमध्ये ( Nagpur) पतंगामागे धावणाऱ्या बालकासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
भारत-श्रीलंका वन डे सामन्यामध्ये किंग कोहलीचा ‘विराट’ शो; ठोकले ७४ वे आंतरराष्ट्रीय शतक
पतंगाच्या मागे धावताना 13 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. नागपूर येथील कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडली आहे. ध्रुव धुर्वे असे या बालकाचे नाव आहे. त्याच झालं असं की, आकाशातील पतंगांच्या लढती बघत कुंभारटोली परिसरातील मुले उभी होती. यावेळी कट झालेला पतंग पकडण्यासाठी, मुले त्या पतंग कटून जात असलेल्या दिशेने बेभाम पळत सुटायची.
पोलीस चौकशींनंतर दुसऱ्याच दिवशी उर्फीने शेअर केले बोल्ड फोटो; चर्चाना उधाण
अशातच एक पतंग कट झाला आणि त्याला पकडण्यासाठी मुलांचे टोळके पतंग जात असलेल्या दिशेने पळत सुटले. यावेळी तुटलेल्या रेल्वे ट्रॅक परिसरात रेल्वे रुळावरुन हा पतंग जाऊ लागला. तो पकडण्याच्या जिद्दीने ध्रुव त्या दिशेने धावू लागला होता. मात्र पतंग लुटण्याच्या नादात त्याचे रेल्वेरुळावरून येणाऱ्या रेल्वेकडेही लक्ष गेले नाही. यावेळी रेल्वेला धडकून ध्रुव पडला व त्याचा मृत्यु ( Death) झाला. या घटनेमुळे कुंभारटोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ललित मोदी ऑक्सिजन सपोर्टवर; तब्येत खालावली! सुश्मिता सेनच्या भावाने दिली माहिती