Site icon e लोकहित | Marathi News

PM Kisan Yojana । फक्त एक चूक आणि तुम्हालाही घेता येणार नाही किसान योजनेचा लाभ, अर्जावेळी टाळा ‘या’ चुका

PM Kisan

PM Kisan Yojana । केंद्र आणि राज्य सरकार (State Govt) शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत असतात. ज्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होतो. यापैकीच सरकारची एक योजना म्हणजे पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) होय. सरकारने शेतकऱ्यांना आतापर्यंत 13 हप्ते देण्यात आले आहे. अशातच आता शेतकरी 14 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच या शेतकऱ्यांना 14 वा हप्ता देण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिली गुड न्यूज! पगारात होणार ‘इतकी’ वाढ

13 व्या हप्त्यादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी छोटया छोट्या चुका केल्या होत्या. त्यामुळे त्यांना 13 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले होते. अशातच जर तुम्ही 14 व्या दरम्यान तुम्ही पुन्हा ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला आताही या हप्त्याला मुकावे लागेल. जर तुम्हाला या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ई केवायसी (E KYC) करणे बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही अजूनही ईकेवायसी केली नसेल, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवरती जाऊन ई केवायसी करता येईल.

अधिकारी होताच पतीला धोका देणाऱ्या ज्योती मौर्य प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, पतीने थेट केले गंभीर आरोप

त्याशिवाय तुम्ही सीएससी (CSC)केंद्रावर जाऊन ही सगळी माहिती भरू शकता. जर तुम्हाला ईकेवायसी करायची असेल तर तुम्हाला पीएम किसान वेबासाईटवर जावे लागणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला ईकेवायसी असा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी तिथे टाका. तुमची ईकेवासीची प्रक्रिया पुर्ण होईल.

भाजपला पुन्हा मोठे खिंडार! चार माजी नगरसेवक आणि 500 कार्यकर्त्यांनी केला बीआरएसमध्ये प्रवेश

Spread the love
Exit mobile version