Site icon e लोकहित | Marathi News

जीवाला धोका असण्याच्या चर्चांवर भडकला जेठालाल, म्हणाला, “खोटी बातमी पसरवली त्याचे…”

Jethalal, fuming over talk of life being in danger, said, "False news has been spread..."

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ( Tarak Mehta Ka Ulta Chashma) ही मालिका छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर करून ठेवले आहे. मागील 14 वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतल्याच्या आरोपावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

दरम्यान, या मालिकेत काम करणारे अभिनेते दिलीप जोशी ( Dilip Joshi) म्हणजे सर्वांचे आवडते कलाकार जेठालाल यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली होती. एका अज्ञात व्यक्तीने नागपूर कंट्रोल रूमला कॉल करून दिलीप जोशी यांना धोका असल्याचे सांगितले होते. या व्यक्तीने जोशी यांच्या घराबाहेर 25 लोक हत्यारे घेऊन उभी असल्याची माहिती दिली होती. दरम्यान पोलिसांनी तपास केला असता अज्ञातांनी दिलेली धमकी फसवी असल्याचे समोर आले आहे. आता याप्रकरणावर दिलीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सॅमसंगच्या ‘या’ लोकप्रिय फोल्डेबल फोनवर मिळवा 49 टक्केंची सूट! वाचा भन्नाट ऑफर

दिलीप जोशी म्हणाले, “ही बातमी खोटी आहे त्यामुळे ज्याने ही खोटी बातमी पसरवली त्याचे भलं होवो. या प्रकरणानंतर अनेकांना माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी वाटली. अनेकांनी मला फोन केले. लोक माझ्यावर इतकं प्रेम करतात हे पाहून मला खूप आनंद झाला.” असं यावेळी दिलीप जोशी म्हणाले आहेत.

“सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतलं” शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Spread the love
Exit mobile version