
देशात सध्या आयपीएलचे (IPL) वारे वाहत आहे. यंदाचा आयपीएल सिझन विविध कारणांनी चर्चेत आहे. अजिंक्य रहाणेचा अचानक सुधारलेला परफॉर्मन्स, विराट कोहली व गौतम गंभीर यांच्यातील वाद व त्यांना बसलेला दंड आणि रोहित शर्माचा घसरलेला परफॉर्मन्स यावर हे यंदाच्या आयपीएल मधले प्रचंड चर्चेचे विषय होते. दरम्यान मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध आरसीबी (RCB) या सामन्याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात घडला धक्कादायक प्रकार; वाचून तुम्हालाही बसेल धक्का…
दोन्ही संघांसाठी प्लेऑफ मध्ये जाण्याच्या दृष्टीने हा सामना प्रचंड महत्त्वाचा असणार आहे. मात्र या सामन्याच्या पार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यात खेळणार नाही. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सुर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. मागच्या सलग दोन सामन्यात रोहित झिरोवर आउट झाला होता. रोहित या सामन्यात का खेळणार नाही ? याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.
एकदम हटके अदांमुळे एका रात्रीत फेमस झालेली मुलगी आठवतेय का? आता समुद्रकिनारी करतेय…
अगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रोहित शर्मा खेळणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी माजी दिगग्ज फलंदाज सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. रोहित शर्माने सध्या आयपीएल मधून विश्रांती घ्यावी व शेवटच्या काही सामन्यांत ताजेतवाने होऊन परतावे असे सुनील गावस्कर म्हणाले होते.
Accident । भीषण अपघात, बसचा चेंदामेंदा; आयुष्यातील ठरला शेवटचा बस प्रवास; चार जणांचा जागीच मृत्यू