Site icon e लोकहित | Marathi News

इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटीलवार केली जोरदार टीका; म्हणाले, “तिच्या कार्यक्रमात…”

Indurikar Maharaj strongly criticized Gautami Patilwar; Said, "In her program..."

मागच्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे. गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) लावण्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावले आहे. महाराष्ट्रात गौतमीचे लाखो चाहते आहेत. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना मोठी मागणी असल्याचे आपल्याला दिसत आहे. तिच्या कार्यक्रमासाठी महिनाभर प्रतिक्षा करावी लागते तेव्हा कार्यक्रमाची तारीख मिळत आहे. लावणी नृत्यांगनांमध्ये गौतमी पाटील सर्वात जास्त मानधन घेते.

श्रद्धा वालकर हत्याप्रकरण; आफताब पूनावालाने पुन्हा बदलला वकील

गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी जवळपास तीन लाखाच्या पुढे रक्कम घेते. लोकही एवढी रक्कम देऊन तिचा कार्यक्रम आयोजित करतात. यावरून गौतमीची क्रेझ किती आहे हे लक्षात येतं. मात्र, तिच्यावर टीका देखील केली जाते. मागच्या काही दिवसापासून तिच्यावर अनेकजण टीका करत आहेत. यामध्येच आता निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज यांनीही गौतमी पाटीलवर टीका केली आहे.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक; तरुणाने थेट…

एका कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाराजांनी नाव न घेता गौतमीवर टीका केली. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतोय. मात्र, गौतमी हिने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, चेंगराचेंगरी होते. आम्हाला मात्र टाळ वाजवून देखील काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिले जात नसल्याचं इंदुरीकर महाराज म्हणाले आहेत. आता त्यांच्या या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.

“लग्नाच्या मंडपात विधी चालु होते, अचानक माकडाने वधू-वराच्या डोक्यावर झेप घेतली अन्…”, पाहा Video

Spread the love
Exit mobile version