Site icon e लोकहित | Marathi News

जागतिक दूध उत्पादनात भारताचा 23 टक्के वाटा

India's share of milk production is 23 percent

भारतात अनेक शेतकरी (Farmer) शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. सध्या बरेच शेतकरी दुधाचा व्यवसाय करताना दिसून येत आहे. त्यामुळे भारतात दुधाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मागच्या आठ वर्षाचा जर आपण विचार केला तर या ८ वर्षाच्या कालावधीमध्ये दुधाच्या उत्पादनात 83 मेट्रिक टन वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. तर जागतिक दूध (Milk) उत्पादनामध्ये भारताचा 23 टक्के वाटा आहे.

बिग ब्रेकिंग! राज्यात प्लास्टिकवरील कडक बंदी हटवली

दुग्धव्यवसायच्या वाढत्या उत्पादनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी समाधान व्यक्त केलंय . याबाबत नरेंद्र मोदींनी एक ट्विट देखील केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हंटल आहे की, “दुग्ध व्यवसाय हा आपल्या देशातील महिला शक्तीला आणखी बळकट करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आगामी काळामध्ये डेअरी क्षेत्र अजून पुढे जाईल”

.

“शिवरायांचा अपमान करण्याऱ्या राज्यपाल कोश्यारींना टकमक टोकावरून फेकून द्यावं”

दरम्यान, भारताला (India) जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हटले जाते. भारतासह आपण जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेचा (America) जागतिक दूध उत्पादनात 11 टक्के वाटा आहे, तर 7 टक्के दूध उत्पादनासह पाकिस्तान (Pakistan) या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मोठी बातमी! माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा पहिला हप्ता २८५१ रुपये

Spread the love
Exit mobile version