Indapur Crime । इंदापूर गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; ज्याला भावासारखा जपलं त्यानेच गेम केला

Indapur News

Indapur Crime । इंदापूर मधील घटनेने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. इंदापूर येथील हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 5 ते 6 जणांनी तरुणावर आधी गोळ्या झाडल्या आणि नंतर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Congress | लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला बसणार मोठा फटका! माजी खासदार करणार पक्षांतर

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपी निष्पन्न झाले आहेत, त्यांना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. माहितीनुसार, अविनाश पंढरपूरला जात असताना त्याच्या मित्राशी संगनमत करून हा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar । “स्वतःच्या सख्या भावाला….”, अजित पवार गटाचे सर्वात मोठे वक्तव्य

या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये काही लोकांनी होटलमधे एंट्री करुन एका व्यक्तीच्या डोक्यात गोळ्या घातल्या असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे फक्त गोळ्यांचं झाडल्या नाहीत तर कोयत्याने देखील वार करण्यात आले आहे.

Politics News | ब्रेकिंग! महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप? राज ठाकरे दिल्लीला रवाना

Spread the love